आज सोने-चांदीच्या किमतीत झाला बदल ; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा प्रति तोळ्याचा भाव

ऑक्टोबर 14, 2022 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी सण काही दिवसावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येतेय. दरम्यान, जागतिक संकेतांमुळे आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुरुवातीच्या व्यापारात सोन्याची किंमत किंचित 10 रुपयांनी घसरली आहे. तर एमसीएक्सवर आज चांदीचा दर 123 रुपयांनी वाढला आहे. Gold Silver Price Today

gold

MCX वर आजचा सोने चांदीचा भाव?
आज शुक्रवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10.30 वाजता 10 रुपयांनी घसरून 50,875 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येचांदीच्या किमतीत 125 रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव 57,263रुपयावर व्यवहार करत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

13 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ कायम राहिली नाही आणि आज ही किंमत घसरली आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.45 टक्क्यांनी घसरून $1,667.13 प्रति औंस झाला. काल सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी वधारला होता. गेल्या अनेक व्यवहारातील घसरणीनंतर गुरुवारी सोन्याचे भाव सावरले. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.40 टक्क्यांनी घसरली आहे आणि 18.99 डॉलर प्रति औंस झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,810 रुपये इतका आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,000 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे सध्या चांदीचा भाव 58,400 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now