आजचा सोनं-चांदी दर ; ‘हे’ आहेत जळगावातील नवीन दर

जुलै 11, 2021 9:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज रविवारी सोन्याच्या दर स्थिर आहे. तर चांदीच्या दरातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात ७०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल शनिवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढले होते. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो १०० रुपयाने स्वस्त झाली होती

gold silver

लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीच पासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली. 

जळगावमध्ये सोन्याचे दर आता ४८ हजार रुपयांवर गेले आहेत. तर, चांदीचे दर सध्या ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. यापूर्वी कोरोना काळात जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर पोहोचले होते. तर, चांदी ७८ हजार रुपयांपर्यंत गेले होते.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.  

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८२३ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,२३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५९३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,९३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ७०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,१०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now