आजचा सोने-चांदीचा भाव : १० जुलै २०२१

जुलै 10, 2021 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । मागील काही दिवसपासून वाढत असलेल्या सोन्याच्या तेजीला काल शुक्रवारी ब्रेक लागला होता. परंतु आज शनिवारी पुन्हा जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव किंचित वधारला आहे. तर चांदीमध्ये मात्र घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो १०० रुपयाने स्वस्त झाली आहे.

gold silver

याआधी कालच्या सत्रात सोने स्थिर होते. तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातील सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. 

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.  

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८२३ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,२३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५९३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,९३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी १०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,४०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now