---Advertisement---
वाणिज्य

मकरसंक्रातीपर्यंत सोने ६० हजाराचा टप्पा गाठणार? आज सोने-चांदीच्या किमतीत झाला ‘हा’ बदल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमती वाढतच आहे. यामुळे सोने लवकरच उच्चांक गाठू शकतो. दरम्यान, विक्रमी किमतीकडे वाटचाल करणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत आज बदल झाला आहे. गेल्या व्यवहारात 56 हजारांचा आकडा ओलांडलेले सोने आज पुन्हा 56 हजारांच्या खाली आले. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मकरसंक्रातीपर्यंत सोने ६० हजाराचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp webp

आज मंगळवारी वायदे बाजारातही चांदीच्या दरात घसरण दिसून आली असून आज चांदीच्या दरात 400 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. चांदीही ६९ हजारांच्या खाली आहे. आज सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 10 रुपयांच्या किंचित घसरणीसह 55,862 वर व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 55,920 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू होता. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याच्या किमतीत मोठी झेप घेतली होती आणि हा विक्रम 56,200 च्या वर जाताना दिसला. मात्र, नंतर विक्री झाली आणि सोन्याचे दर खाली आले.

---Advertisement---

चांदीची चमक देखील पडली फिकी
आज मंगळवारी सकाळी 10 वाजता MCX वर चांदीचा भाव 430 रुपये किंवा 0.62 टक्क्यांनी घसरून 68,470 वर आला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 68,671 वर उघडपणे सुरू झाला होता. एक दिवसापूर्वी चांदीचा वायदा भावही 70 हजारांच्या पुढे जात असल्याचे दिसत होते, मात्र नंतर विक्री वाढल्याने त्याचे भावही घसरले आणि भाव पुन्हा एकदा 69 हजारांच्या खाली आले.

जागतिक बाजारात सोने मजबूत, चांदी तुटली
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.11 टक्क्यांनी वाढून $1,871.57 प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत 1.99 टक्क्यांनी घसरून $23.52 प्रति औंस झाली. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

सोन्याचा पुढील अंदाज काय असेल?
सोन्याच्या किमती MCX वर विक्रम मोडण्यास उत्सुक असताना, स्पॉट मार्केटमध्ये त्याची किंमत देखील कोरोनापूर्व पातळीच्या वर गेली आहे. दरम्यान, मकरसंक्रातीपर्यंत सोने 60 हजाराचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---