Gold-Silver Rate : सोने स्थिर तर चांदी महागली, वाचा आजचे भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारपेठत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोन्याचा दर स्थिर आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. आज चांदीच्या दरात १९० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. त्या दिवशी सोने ५९० रुपयाने स्वस्त झालं होत तर चांदीत १८६० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील भाव :
जळगाव सराफ बाजार पेठेत आज सोमवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,०३० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत असल्याने पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारपेठ पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने आगामी काळात सोन्याच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने ३ वेळा महागले आहे. तर दोन वेळा स्वस्त झालं आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ५०० रुपयांहून अधिकने घसरण झाली आहे. तर चांदी दरात २१०० रुपयाची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

०३ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१३० रुपये असा होता. ०४ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,१९० रुपये इतका नोंदविला गेला. ०५ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६८० रुपये इतका नोंदविला गेला. ०६ जानेवारी (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७०० रुपये इतका नोंदविला गेला. तर शुक्रवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,८४० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -