⁠ 
बुधवार, डिसेंबर 4, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांनो! सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्ण संधी; भाव इतक्या रुपयांनी घसरला..

ग्राहकांनो! सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्ण संधी; भाव इतक्या रुपयांनी घसरला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२४ । या आठवड्याच्या सुरुवातीला जळगावच्या सुवर्णपेठेत सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. सुरुवातीच्या दोन दिवसात सोन्याचा दर प्रति तोळा २६०० रुपयांनी घसरला होता. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र यांनतर सलग तीन दिवसात वाढ झाली.

तर शनिवारी किंचित घसरण झाली असून यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ७७००० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे शनिवारी चांदीचा दर स्थिर दिसून आला. चांदीचा एक किलोचा दर ९१००० रुपयांवर आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी (२५ नोव्हेंबर)सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७८,९०० रुपयावर होता. दोन दिवासात झालेल्या घसरणीनंतर बुधवारी सकाळी सोन्याचा दर ७६,४०० रुपयांवर आला होता. मात्र यानंतर तीन दिवसात सोने ७०० रुपयांनी वधारले होते. या आठवड्यात सोने दरात १९०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लग्नसराईत सोनं स्वस्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पुढील काही दिवसात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. अशातच सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्ण संधी आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.