विक्रमी उच्चांकानंतर सोन्याचे दर घसरले; सलग पाचव्या दिवशीही घट, जळगावात आता भाव किती?

मार्च 6, 2026 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२६ । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या आठवड्यात अखेरीस सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला होता. मात्र या आठवड्यात सोन्याचे दर घसरले आहे. सलग पाच दिवसांपासून सुरु असलेली सोन्याच्या दरातील घसरण आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर कायम राहिली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

gold silver

काय आहेत सोन्याचा दर

जळगाव सुवर्ण बाजारात आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने दरात १२३६ रुपयांची घट नोंदवली गेली आणि दर १ लाख ६४ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. यापूर्वी गुरुवारी १७५१ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार ३६ रुपयांपर्यंत खाली आले होते. बाजारातील जाणकारांच्या मते, सोन्याच्या दरातील ही घसरण तात्पुरती असू शकते. जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि गुंतवणुकीचे ट्रेंड यावर पुढील काळात सोन्याच्या दरांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सध्या सोन्याची खरेदी करण्यासाठी तुलनेने अनुकूल वातावरण असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

चांदीचा दर

दरम्यान, चांदीच्या दरात मात्र थोडीशी उसळी दिसून आली. काही दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी प्रति किलो २ लाख ७५ हजार रुपये पर्यंत खाली आलेला दर शुक्रवारी वाढून २ लाख ७८ हजार १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. आज सकाळच्या सत्रात चांदी दरात ३०९० रुपयांची वाढ नोंदवली गेली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now