जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । साडेतीन मुहुतापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीतमध्ये २० ते २५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ दिसून आली. यामुळे जळगावमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे.

सोने पुन्हा 800 रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर ९३ हजार रुपयांवर पोहचला आहे तर चांदीचा दर १ लाख ५ हजारांवर पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे.
सध्या सोन्यासह चांदीचे भाव आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असूनही गुढीपाडव्याच्या मुहूर्तामुळे सोने-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचे प्रमुख ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक सुवर्णनगरीमध्ये आले होते. मात्र सोन्याचा भाव वाढला असल्यामुळे गुढीपाडवा झाल्यावर सोन्याचा दर हा कमी होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे न होता आज ज्यावेळी सोने खरेदी करायला ते पुन्हा दुकानात आल्यावर त्यांना सोन्याचे दर वाढल्याचे दिसले. आज पण सोन्याचे दर ९३ हजारांवर गेले आहे. सोन्या- चांदीचे दर कुठेतरी कमी व्हावे अशी अपेक्षा महिला ग्राहकांनी व्यक्त केली.