जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२५ । जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढती अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शुल्क आकारण्याच्या धमक्यांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या (Gold Rate) किमतीने मोठी उसळी घेतलीय. सध्या ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे पडले. दरम्यान गेला संपूर्ण आठवडा सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तर आता नवीन आठवड्यात देखील सोनं महागलं आहे. Gold Silver Rate Today

आजच्या दिवशीही सोन्याचे भाव वाढले आहे. Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ८,०६९ रुपयांना विकलं जात आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ८०,६९० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ८८,०२० रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं ८,८०२ रुपयांनी विकलं जात आहे.
जळगाव
22 कॅरेट १ ग्रॅम सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट १ ग्रॅम सोनं – 8,787 रुपये