महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये आढळल्या सोन्याच्या खाणी.. मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दोन सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. याबाबतची माहिती खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. 

राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना याबाबतचे संकेत सुद्धा दिले होते. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करुन या व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी आढळल्या असल्याची माहिती आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांनी तसा अहवाल दिला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदे यांनी हा खुलासा केला आहे.