जळगाव जिल्हा
तेजस्विनी सोनवणेला सुवर्ण पदक
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । दीपनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत जळगांव पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू तेजस्विनी विनोद सोनवणे हिने इन्लायिन या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
तेजस्विनी सोनावणे हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच जळगांव स्पोर्ट्स अकॅडमीचे स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे यांनी तिचं कौतुक करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.