⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | गुन्हे | जळगावातील गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षासाठी केलं हद्दपार

जळगावातील गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षासाठी केलं हद्दपार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । सात वर्षांपुर्वी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केल्यानंतर पुन्हा दहशत निर्माण करत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी काढले आहे. आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक, सुप्रीम कॉलनी) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत असल्याने त्याच्यावर २०१४ पासून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दुखापत करणे व इतर वेगवेगळे आठ गुन्हे दाखल आहे. त्याची दहशत पाहता त्याला २०१६ मध्ये एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

हद्दपारीच्या प्रस्तावाची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, निलोफर सैयद, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांनी केली. हद्दपार कालावधीत विश्वे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.