⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

रिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जागीच ठार, ममुराबादजवळील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । जळगावमध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून अशातच भरधाव रिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ममुराबादजळील पेट्रोलपंपासमोर घडली असून विजय पंडीत कोळी (४५, रा. पार्वती ओक नगर) असं अपघातातील मृताचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
विजय कोळी हे दुचाकीने (क्र. एमएच १९, एवाय ७९०५) विदगावहून जळगावकडे येत असताना रिक्षा (क्र. एमएच १९, व्ही ३६४२) मजुरांना घेवून यावलकडे जात होती. ममुराबादजवळील फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व पोहेकॉ विलास शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कोळी यांना नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाहनांची झालेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचालकदेखील जखमी झाला आहे.