जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शालिनी दिगंबर पाटील (वय ६५) या महिलेच्या गळ्यातील मंगल पोत लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसांत दोन अज्ञात भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जीवन नजरात रहिवासी असलेल्या शालिनी दिगंबर पाटील (वय ६५) यांना त्यांच्या राहत्या घरच्या काही अंतरावर दोन अज्ञात भामटे पत्ता विचारण्याचा बहाण्याने जवळ आले. त्यातील मागे बसलेल्या भामट्याने शालिनी दिगंबर पाटील यांच्या गळ्यातील ६५ हजार किमतीची २ तोळ्याची मंगल पोत बळजबरीने हिसकावून नेले. तसेच अज्ञात भामट्यांचे नखे गळ्या खाली जोरात लागल्याने शालिनी दिगंबर पाटील या जखमी झाल्या आहेत.
शालिनी दिगंबर पाटील यांनी दि. ३ रोजी रामानंद नगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्द भा.कलम ३९४,३४ प्रमाणे रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सनोपी रोहिदास गभाले करीत आहेत.