मुलाला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या पित्यासोबत घडलं विपरीत

जुलै 7, 2024 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२४ । मुलाला शाळेत सोडून वडील दुचाकीने घरी जात असताना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.सुवर्णसिंग घोरपडे (वय ३५) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी दुचाकी चालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील नवे दसेगाव येथील सुवर्णसिंग घोरपडे यांनी त्यांच्या मुलाला चाळीसगाव येथे शाळेत शिक्षणासाठी टाकले होते. यामुळे मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने दसेगाव फाट्यावर यावे लागत होते. दरम्यान नेहमीप्रमाणे सुवर्णसिंग घोरपडे हे फाट्यावर आले असता मुलाला व्हॅनमध्ये बसवले. यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. दसेगाव फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असल्याने एकमार्गी रस्त्यावर सुवर्णसिंग दुचाकीने जुने दसेगाव फाट्याकडे वळण घेत असतांना चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणार्‍या दुचाकी चालकाने सुवर्णसिंग याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात सुवर्णसिंग हा रस्त्यावर पडला.

दुचाकीने दिलेल्या धडकेत जबर मार लागल्याने नागरीकांनी आधी चाळीसगाव येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक मार लागल्याने त्यास धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा सहाव्या दिवशी मृत्यू झाला. यावेळी धडक देणारा दुचाकीस्वार दुचाकीसह पळून गेला. सदर घटना १ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी फरार दुचाकी चालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now