मातंग समाजाला पाचोऱ्यात सामाजिक सभागृह द्या !

जून 26, 2021 9:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । पाचोरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मातंग समाज बांधव राहत आहेत. त्यांचे विविध प्रकारचे धार्मिक कार्य, लग्न सोहळे, समाजाचे मेळावे आदी कामांसाठी समाजाकडे हक्काची जागा नाही.

matang samaj pachora

त्यामुळे पाचोरा नगरपालिका हद्दीत मातंग समाजासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे किंवा लहुजी सावळे यांचे नावे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून मिळावे अशी आग्रही मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने आ.किशोर अप्पा पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील पाचुंदे, तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now