Pachora : झोपेत असलेल्या बहिणीसोबत चुलत भावाचे धक्कादायक कृत्य

जून 4, 2023 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धकाकदायक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आलीय.

crime 3 1 jpg webp

सुट्यांमध्ये आजीकडे आलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच संशयित चुलत भावाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेली होती. त्यावेळी तिचा चुलत भाऊ याने ५ मे रोजी ११ वाजता पिडीत मुलगी ही घरात झोपलेली असतांना अचानक येवून तिच्याजवळ झोपला व अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चुलत भाऊ याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now