खडसेंनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता तर.. गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२२ । भूखंड घोटाळाप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. यावरून आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता तर त्यांच्याकडून घेण्यात आला होता, असं स्फोटक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. आता एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. एकनाख खडसे यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्याकडून तो घेण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे यांचे जावई जेलमध्ये आहेत, जावायाला सोडवण्यासाठी आधी त्यांनी प्रयत्न करावेत. आपण काय पराक्रम केले आहेत हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही यावेळी महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.