जळगाव जिल्हाराजकारण

कसंतरी मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, पण.. गिरीश महाजनांनी व्यक्त केली ‘ती’ खंत..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी महाजनांनी एक जुना किस्सा सांगितलं. “मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी लागली नाही, त्याचं दुःख मला आजही आहे”, अशी खंत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात 19 हजार जागांसाठी पद भरती राज्य शासनाने हाती घेतले असून ती महिनाभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. यावेळी परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यांवर बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही पदासाठी परीक्षा घेणं हे पहिले इतकं सोपं राहिलेलं नाही. परीक्षांमध्ये आता खूप गडबडी व्हायला लागली आहे. परीक्षा घेणं ताप झालेला आहे. मग आता युपीएससी परीक्षांमध्ये सुद्धा आता घोळ होत असल्याचे समोर येत आहे. या परीक्षा सुद्धा आता क्रॅक व्हायला लागले आहेत. मोबाईलमुळे हा सर्व ताप झाला आहे. मोबाईल वरून कोणी प्रश्नपत्रिका बाहेर पाठवतो, कोणी बाहेरून उत्तर पत्रिका आतमध्ये पाठवतो, अशा पद्धतीने सगळ्या गडबडी होतात. यावर मी आता फारस बोलणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

माझे वडील सुद्धा शिक्षक. मी अभ्यासामध्ये खूप मागे होतो. पण खेळात पुढे होतो. हे सोडून नोकरी लागली पाहिजे, अशी वडिलांची इच्छा होती. पण माझा ट्रॅक चुकला. मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी लागली नाही, त्याचं दुःख मला आजही आहे. पण आज मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो आणि बाहेरील देशामधील तज्ज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन केलं, अशी गंमतीशीर लोकशाही आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button