बातम्या

आज माझा ‘तो’ अंदाज तंतोतंत खरा ठरवला; उद्धव ठाकरेंबाबत गिरीश महाजन काय म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२५ । राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या (Congress) मांडीवर जाऊन बसला, पवार साहेबांच्या जवळ जाऊन बसला, त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले होते. बाळासाहेबांचे विचार असे होते का? की काँग्रेस सोबत जाऊन बसा.

मी आधीच बोललो होतो की तुमचा पक्ष संपलेला असेल त्यानुसार आज माझा शब्द तंतोतंत खरा ठरला असं मंत्री महाजन म्हणाले, तसेच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याची जोरदारही त्यांनी भाष्य केलं

भविष्यामध्ये काय काय होईल ते बघा.आता आश्चर्य वाटण्यासारखं काही राहिलेलं नाही. अनेक जण पक्ष सोडतील महाविकास आघाडीमध्ये जायला आता कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेते सुद्धा वेगळ्या मनस्थितीमध्ये चाललेल्या आहेत. असं ते म्हणाले. यापुढे ही महाविकास आघाडी आपल्याला कुठेही दिसणार नाही. इथे कोणी राहायला उत्सुक नाही त्यांचे आमदार उत्सुक नाहीये खासदार उत्सुक नाहीये. नेते सर्वदिशाहीन झालेले आहेत.एकेका पक्षांमध्ये चार चार गट त्यांच्या आहेत… त्यामुळे कोणी काही बोललं की लगेच दुसरा त्याला उत्तर देतो आहे

जळगावच्या पालकमंत्र्याबाबत काय म्हणाले
राज्यात जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीमध्ये सुटताना दिसत नाहीय. दरम्यान, जळगावच्या पालकमंत्री कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले असून याच दरम्यान गिरीश महाजन यांनी यावर भाष्य केलं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमचे अध्यक्ष आहेत. हे सर्व नेते याबद्दल रोज चर्चा करत आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्यासाठी मला असं वाटतं लवकरच आता फार काही वेळ लागणार नाही असं मंत्री महाजन म्हणाले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button