ना.गिरीश महाजनांचा झुम्बा डान्स पाहिलात का? पहा ‘हा’ VIDEO

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । भाजप नेते आणि धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अशातच एक डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महाजन हे चक्क झुम्बा डान्स करताना दिसत आहेत.

धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘हिट धुळे फिट धुळे’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी हा भन्नाट झुम्बा डान्स यावेळी केला.या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, कशा प्रकारे गिरीश महाजन हे मोठ्या उत्साहाने डान्स करत आहे. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.