चोपडा मतदारसंघातून घनश्याम अग्रवाल यांचा ६३ मतांनी विजय

नोव्हेंबर 22, 2021 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चोपडा विकासो मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल यांनी अक्षरश: एकहाती आणि एकतर्फी ६३ मतांनी विजय मिळविला आहे.

agrahval 1 jpg webp

सविस्तर असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चोपडा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघांत खूप घटना घडल्या. यात महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलमधून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती. यात कॉंग्रेसला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर राष्ट्रवादीने याला प्रखर विरोध करून भाजपमधून नुकतेच पक्षात आलेले घनश्याम अग्रवाल यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला होता. यामुळे अखेर येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल आणि डॉ. सुरेश शामराव पाटील आणि संगीता प्रदीप पाटील हे तीन उमेदवार उरले होते. यात अरूणभाई गुजराथी यांची पूर्ण ताकद ही घनश्याम अग्रवाल यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय सहजशक्य मानला जात होता. तर आजच्या निकालातून त्यांनी अक्षरश: एकहाती आणि एकतर्फी विजय संपादन केला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत घनश्याम अग्रवाल यांना सर्वच्या सर्व ६३ मते मिळाली. यामुळे त्यांची संचालकपदी निवड करण्यात आली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now