⁠ 
रविवार, मे 5, 2024

दिलासादायक ! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, पहा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आज (१ एप्रिल) सरकारने मोठी भेट दिली आहे.एलपीजी सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमती कमी झाल्या आहेत. आज व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जारी केले जातात. त्यानुसार आज व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले. यातून लोकांना दिलासा मिळणार आहे.

मागील महिन्यातच व्यावसायिक सिलिंडरमध्ये 350 रुपयांची वाढ करण्यात आली होती याशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच रक्कम भरावी लागेल.

व्यावसायिक सिलेंडरची किंमत किती होती?

आज 1 एप्रिलपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत 2028 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत दिल्लीत 2119.50 रुपये, कोलकात्यात 2221.50 रुपये आणि मुंबईत 2071.50 रुपये होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही
विशेष म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1,103 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये 1,129 रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1102.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला रु.1118.50 द्यावे लागतील.