जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांची टोळी जेरबंद केली आहे. दोघांकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरातील कांचननगर येथे राहणाऱ्या योगेश दिलीप तांबट यांची दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीएस.८५९२ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा, हवालदार गजानन महाजन, विजय चौधरी, अरुण निकुंभ, संजय महाजन, उमेश भालेराव, अमोल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर यांच्या पथकाने केलेल्या तपासात संभाजी बाळू पाटील रा.सातरणे, जि.धुळे आणि निलेश रवींद्र पाटील रा.सबगव्हाण, ता.अमळनेर, जि.जळगाव यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी एक विना क्रमांकाची हिरो डिलक्स, एक होंडा युनीकॉर्न, दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएन.६४३०, एमएच.१९.बीबी.८७५६, एमएच.१९.एएल.२१४१, एमएच.१९.बीएस.८५९२ या हस्तगत केल्या आहे. पुढील तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत. दुचाकी मालकांनी पाळधी पोलीस ठाण्याच्या ०२५८८-२५५३३३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे देखील वाचा :
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना
- ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले