जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । नवजीवन एक्स्प्रेसमधून ६ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरी प्रकरणी रेल्वे सुरक्षा विशेष पथकाने नेपानगरातून चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. याप्रकरणी ४ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.

लोहमार्ग पोलिसांनी आजच्या बाजार भावानुसार १८ लाख हजार १८९ रूपयांचा सोन्याचांदीच्या दागिन्याचा माल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी नवजीवन एक्स्प्रेस (१२६५५) मधून दिलीपकुमार जैन (रा. नेल्लोरसिटी, आंध्रप्रदेश) यांचा ६ लाख ३२ हजारांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणाचा तपास करतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरपीएफच्या पथकाने भुसावळ जंक्शनवर पटना कुर्ला जनता एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून उतरलेल्या चौघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
यात रमजान हुसेन खान (क्य ४०, रा. नेपानगर जि. ब-हाणपूर, तोशिफ चिन्मान खान (वय २२, रा. नेपानगर जि. ब-हाणपूर), इरफान हमीद खान (वय २०, रा. नेपानगर जि. बहऱ्हाणपूर) यांची चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीवरून चौथ्या संशयित मुश्ताक मुस्तफा खान (वय १८, रा. नेपानगर जि. बऱ्हाणपूर) याची चौकशी केली. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.