जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत ढिवरे नवे एसपी

एप्रिल 20, 2026 7:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२६ । राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे नवे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

sp dhivare

डॉ. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या होत्या. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची कारकीर्द विशेष ठरली.

दरम्यान, त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिवरे हे अनुभवी अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे :

१. निखिल पिंगळे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, सातारा.
२. राजकुमार शिंदे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, वाशीम.
३. महेश्वर रेड्डी : पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सीआयडी पुणे.
४. तुषार दोशी : पोलिस अधीक्षक, सातारा ते पोलिस अधीक्षक, सांगली.

५. संदीप घुगे : पोलिस अधीक्षक, सांगली ते पोलिस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
६. योगेश गुप्ता : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.
७. नीलोत्पल : पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, कोल्हापूर
८. एम. रमेश : अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, गडचिरोल.
९. श्रीकांत धिवरे : पोलिस अधीक्षक, धुळे ते पोलिस अधीक्षक, जळगाव..

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now