नशिराबाद येथे अंगारक चतुर्थीनिमित्त गणेशाची विधिवत पूजा
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत पूजा संपन्न झाली.
सर्वप्रथम अंगारक चतुर्थी चे आऊचीत्य साधून माध्यमिक पर्यवेक्षक बी.आर. खंडारे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. या कार्यक्रमास माध्यमिक मुख्याध्यापक सी.बी. अहिरे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, आर.एल.पाचपांडे, हेमंत सावकारे, टि.टी. सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी मंदार वाणी याने गणपती स्त्रोत गायन केले तर त्याच्या मागे सर्व विद्यार्थ्यानी सामूहिक पणे गणपती स्त्रोत चे पठण केले. तसेच सर्व विद्यार्थांनी, पालकांनी व शिक्षकांनी दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा स्वाद घेतला. यावेळी प्रा. विनायक कोष्टी यांनी प्राथमिक विभागास श्री गणेशाची मूर्ती दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन संगीता जोशी यांनी केले.