⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

स्मिता वाघ, रक्षा खडसे, करण पाटील, श्रीराम पाटील यांच्याकडे किती संपत्ती? वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या चारही उमेदवारांनी अर्ज भरला आहे. यावेळी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचे विवरण दिले त्यानुसार रावेरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील सर्वात धनी उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नावावर ३६ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर रक्षा खडसे यांच्याकडे साडे दहा कोटींची संपत्ती आहेत. शपथपत्रानुसार रक्षा खडसे यांच्या संपत्तीत सन २०१४ ते २०२४ या गेल्या दहा वर्षात ४ कोटी ५१ लाख ८३ हजार १५ रुपयांनी वाढली आहे.

दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि उद्धव सेनेचे करण पाटील (पवार) हे प्रमुख उमेदवार आहेत. स्मिता वाघ यांच्या तुलनेत करण पाटील (पवार) यांच्याकडे जास्त संपत्ती आहे. त्यांच्याकडे १३.५ कोटींची संपत्ती आहे, तर त्यांच्यावर १७ कोटी २२ लाखांचे कर्ज आहेत. स्मिता वाघ यांच्याकडे ६ कोटींची संपत्ती असल्याचं शपथपत्रात नमूद केलं आहे. स्मिता वाघ यांच्यावर ८७ लाख ६६ हजारांचे कर्ज आहेत.

श्रीराम पाटील यांची ३६ कोटींची संपत्ती (Shriram Patil)
रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या नावावर ३६ कोटींची संपत्ती आहे. शपथपत्रानुसार, स्वतः पाटील यांच्याकडे ३०५ ग्रॅम सोने, तर त्यांच्या पत्नीकडे ४२ लाखांचे ५८५ ग्रॅम सोने आहे. श्रीराम पाटील यांच्याकडे ७ वाहने आहेत. श्रीराम पाटील यांच्याकडे १५ कोटी ५६ लाख १२ हजार स्थावर संपत्ती तर २१ कोटी, ४१ लाख ४८ हजार २५९ जंगम संपत्ती आहे. त्यांच्या पत्नी आशाबाई पाटील यांच्याकडे ११ कोटी २६ लाख ३२ हजार ३८७ स्थावर संपत्ती असून ५ कोटी ५४ हजार ७८२ जंगम संपत्ती आहे. श्रीराम पाटील यांनी २०२२-२३ मध्ये २ कोटी ७ लाख ३१ हजार ६५० रुपयांचे वार्षिक उत्पन्न नमूद केले आहे, तर त्यांच्या पत्नी आशाबाई यांचे ५६ लाख ३८ हजार ५० रुपयांचे उत्पन्न नमूद केले आहे. श्रीराम पाटील यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे १ कोटी ९५ लाख ८३ हजार ९६४ रुपये इतके कर्ज आहे, तर आशाबाई पाटील यांच्या नावावर ३ कोटी ७८ लाख ४२ हजार ३२६ रुपयांचे कर्ज आहे.श्रीराम पाटील (वय ५३) यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. 

रक्षा खडसे यांची संपत्ती किती? (Raksha Khadse)
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याकडे १० कोटी ५१ लाख ६१ हजार १०२ रुपये किंमतीची संपत्ती आहे. त्यांची कन्या व मुलाकडे ४ कोटी १९ लाख ९ हजारांची संपत्ती आहे. रक्षा यांच्याकडे २०१९ च्या निवडणुकीत ६ लाखांचे २०० ग्रॅम सोने होते. आता २२० ग्रॅम सोने आहे. २०२२-२३ मध्ये रक्षा खडसे यांचे वार्षिक उत्पन्न ८९ लाख ५३ हजार ३९० रुपये आहे.२०१९ च्या प्रतिद्वापत्रानुसार २१ लाख ३५ हजार रुपये किमतीची कार, एक ट्रैक्टर व ३१ लाख ६५ हजारांची महागडी कार होती. आता ३४ लाख ६९ हजार रुपये किमतीची कार व एक ५२ हजार रुपये किमतीची दुचाकी आहे.

जंगम संपत्ती
रक्षा खडसे यांच्याकडे १० लाख ७० हजारांची रोकड आहे. तर स्थावर आणि जंगम मालमत्ता २० कोटी ५१ लाख ६१ हजार २०२ रुपये किमतीची आहे. त्यात जंगम संपत्ती ६ कोटी ७७ लाख ७ हजारांची आहे. त्यांची कन्या क्रिषीका व मुलगा गुरुनाथ यांच्या नावाचर प्रत्येकी २ कोटी ०९ लाख ५४ हजार ५०० रुपयांची मालमत्ता आहे
स्थावर मालमत्ता किती?
रक्षा खडसे यांच्याकडे २०१९ मध्ये ३ कोटी ७४ लाख ५३ हजारांची स्थावर मालमत्ता होती. त्यात फारशी वाढ झालेली नाही सध्या ३ कोटी ७४ लाख ५३ हजार ५०० रुपयांची मालमत्ता आहे.

करण बाळासाहेब पवारांवर १७ कोटींचे कर्ज (Karan Pawar)
महाविकास आघाडीचे जळगाव मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) यांच्याकडे १३ कोटी ५९ लाख २० हजार २७७ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम मोठी असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. कर्जाच्या रकमेत एकट्या ‘बीएचआर’ पतसंस्थेची रक्कम १०.४३ कोटींच्या घरात आहे त्यांच्यावर एकूण १७ कोटी २२ लाख ८६ हजार ५२३ रुपयांचे कर्ज आहे. करण पाटील यांच्याकडे ३ लाख रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोने तर त्यांच्या पत्नी अंजलीकडे ५० ग्रॅम सोने आहे.करण पाटील यांचे ७ लाख ४० हजार ८७० तर त्याच्या पत्नीचे ४ लाख ४७ हजार ४२१ रुपये वार्षिक उत्पन्न नमूद केले आहे.
जंगम मालमत्ता किती?
करण पाटील यांच्याकडे ७ कोटी ३९ लाख २० हजार २७७ रुपयांची तर त्यांच्या पत्नी अंजली यांच्याकडे ५९ लाख ५६ हजार ९६९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
स्थावर मालमत्ता किती?
करण पाटील यांच्याकडे ६ कोटी २० लाखांची तर अंजली यांच्याकडे २० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

स्मिताताई वाघ (Smitatai Wagh)
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर ६ कोटी ९ लाख ७४ हजार ८९७ रुपयांची संपत्ती आहे. स्वतः वाघ यांच्याकडे ३६० ग्रॅम सोने तर त्यांची लेक ईशानीकडे ६९ लाख ५५ हजार ५२६ रुपयांच्या संपत्तीसह १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.स्मिता वाघ यांच्याकडे २ कोटी ५६ लाख ९७ हजार ८९८, रुपयांची जंगम संपत्ती आहे. त्यांची कन्या ईशानीकडे ४८ लाख ५९ हजार ५२६ रुपयांची संपत्ती आहे.
स्मिताताई यांच्याकडे इगतपुरी, जळगाव, पुण्यासह अन्यठिकाणी ३ कोटी ५२ लाख ७७ हजार रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे. कन्येकडे २१ लाख ४ हजारांची स्थावर मालमता आहे. वाघ यांनी २०२२-२३ मध्ये १९ लाख ८९ हजार ५९० रुपयांचे उत्पन्न नमूद केले आहे. स्मिता वाघ यांच्यावर८७ लाख ६६ हजारांचे कर्ज असून कन्येकडे ८ लाख ३४ हजारांचे घेणे आहे. स्मिताताई वाघ यांच्याकडे १४ लाख ८१ हजाराची एक कार तर ७३ हजाराची दुचाकी आहे