⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मुलास सैन्यदलात लावून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यास लाखाचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । हिंगोणा (ता.यावल) येथील एका शेतकऱ्यास संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधुकर पाटील (सर्व रा.न्हावी,ता.यावल) यांनी तुझ्या मुलास सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एक लाख रुपये आगाऊ घेत फसवणूक केली. या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादवरुन फैजपूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की,हिंगोणा येथील शेतकरी शांताराम मांगो तायडे (वय ५२) हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गौरव शांताराम तायडे याला सैन्यात लावून देण्याचे आमिष दाखवत संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधुकर पाटील (सर्व रा. न्हावी, ता.यावल) यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती.

शेतकरी शांताराम तायडे यांच्याकडून ३० मे २०२० रोजी एक लाख रुपये आगाऊ म्हणून दिले. सोबत मुलगा गौरवचे बारावी पास झाल्याचे कागदपत्र आणि दोन फोटो दिले होते. दरम्यान, आजपर्यंत कोणतेही काम न झाल्याने शेतकरी शांताराम तायडे यांनी पैश्यांची परत मागितले असता संशयित आरोपी केतन पाटील यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर शिवीगाळ करून, ‘तुमच्याकडे काय लेखी पुरावा आहे का, तुम्ही कोठेही जा, काहीही होणार नाही, असे बोलून जातीवाचक शिविगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यासंदर्भात शेतकरी शांताराम तायडे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधुकर पाटील (सर्व रा. न्हावी, ता. यावल) विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.

हे देखील वाचा :