जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । जळगाव शहरातील खोटेनगर येथे असलेल्या बस स्टॉपजव शिव फर्निचर नावाच्या दुकानाला बुधवारी रात्री आग लागली. अंदाजे पहाटे २.३० च्या सुमारास अचानक फर्निचरने पेट घेतल्याने हे भीषण आग लागली. यावेळी कोणाचीही जीवित हानी झाली नसली तरी फर्निचरचे मोठे नुकसान झाले.
यावेळी मनपाच्या महाबळ, गोलाणी मार्केट अग्निशमन विभागाचे बंब लागलीच घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ५ वाजेपर्यंत १२ बंब रिकामे झाल्यावर आग नियंत्रणात आली.जळगाव मनपाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, मुख्य फायरमन अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन चालक प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.
आगीचे कारण जरी अद्याप समजू शकले नसले तरी या आगीत व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे स्वतः अग्निशमन दल देवदूत ठरले हि बाब नाकारता येणार नाही. करणं वेळेवर अग्निशमनदल पोहोचले नसले तर होण्याचं नव्हतं झाल असते आणि आगीवर अंकुश ठेवणे शक्य झाले नसते.