⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

अवकाळीमुळे पीक वाया गेलं, कर्ज कसं फेडणार, विवंचनेतून शेतकऱ्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने डोक्यावर वाढलेला कर्जाचे डोंगरामुळे नैराश्य आल्याने भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वेगाडी झोकून देत आत्महत्या केली. छबीलदास शामराव कोळी (49) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत असे की, साकेगाव येथील शेतकरी छबीलदास शामराव कोळी यांनी शेती कामासाठी बँकेतून कर्ज काढले होते. अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने डोक्यावर वाढलेला कर्जाचे डोंगरामुळे नैराश्य आल्याने छबीलदास कोळी यांनी दत्त मंदिरापुढे वांजोळा मार्गावर असलेल्या रेल्वेलाईनवर खांबा क्रमांक 438/27,439/1 जवळ स्वतःला रेल्वे गाडी खाली झोकून देत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, सहा.निरीक्षक अमोल पवार, कॉन्स्टेबल वाल्मीक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत भूषण गणेश मराठे या रेल्वे कर्मचार्‍याने खबर दिल्याने तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास वाल्मीक सोनवणे करीत आहेत. दरम्यान, मतय शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सपकाळे यांचे चुलत भाऊ होत.

हे देखील वाचा :