⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

कळमडुच्या शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील कळमडु गावाचे वीर सुपुत्र, शहीद जवान अमोल राजेंद्र देवरे यांच्यावर शोकमग्न वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तसेच देवरे कुटुंबीय व नातेवाईकांचे सांत्वन केले.

काही महिन्यांपूर्वीच पितृछत्र हरवले होते. देवरे कुटुंब त्या दुःखातून सावरत नाही तोच घरातील एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना शहीद झाल्याने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शहीद अमोल देवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार निधीतून ३० लाख रुपये खर्चातून भव्य अश्या स्मारकाची उभारणी कळमडू गावात केली जाईल. तसेच देवरे कुटुंबियांच्या पाठीशी सर्व तालुका उभा राहील अशी ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.