खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान महिला कैदीला अटक

जुलै 11, 2022 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान महिला आरोपी निर्मलाबाई अशोक पवार (वय ५१ रा. टोणगाव ता.भडगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

crime muder jpg webp

आरोपी महिला निर्मलाबाई अशोक पवार यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आल्याने त्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहत शिक्षा भोगत असताना त्यांना अकस्मित कोविड-१९ अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. सदर आरोपी महिला बंदी केल्याची तारखेवर हजार न झाल्याने याबाबत भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी महिला या त्यांच्या गावी टोणगाव ता.भडगाव येथे आल्याचे येथील पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करून अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पोहेकॉ अरुण पाटील, पोना रणजित जाधव, पोना किशोर राठोड, पोकॉ विनोद पाटील, रत्ना मराठे, उपाली खरे, राजेंद्र पवार यांनी केली. दरम्यान, ताब्यातील आरोपी महिलेला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now