महाराष्ट्र

फडणवीस स्टिंग ऑपरेश, प्रवीण चव्हाण, तेजस मोरे यांच्यातील व्हाट्सअँप चॅट समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वी विरोधी विधानसभेत पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Praveen Chavan)यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. या स्टिंगऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप नंतर व्हाट्स अँप चॅट (whatsapp Chat)आलं समोर आलं आहे.

जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात कोणावर कोठे छापे टाकायचे? पंच कोणाला घ्यायचं? याची माहिती मोरेंनी तपास पोलीस अधिकाऱ्यांना पुरवली असल्याचे दिसून येत आहे.

इतकचं नाही तर पोलिसांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था असलेली ठिकाणे मोरे यांनी पोलिसांना कळवली असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांना न्यायालयात या केस संदर्भात जे म्हणणं मांडायचं होत त्याचा ड्राफ्टही मोरे यानेच पोलिसांना दिला होता. अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

याचाच अर्थ तेजस मोरे हा तपास अधिकारी आणि प्रवीण चव्हाण यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका करत होता. परंतू तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

या तक्रारीनंतर मोरेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा लवकर नोंद केला जाणार आहे. त्यामुळे नक्की हे प्रकरण यापुढे कोणत्या दिशेला जातं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button