⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

Voice Of Dog या संस्थेतर्फे जळगावमधील 150 पेक्षा जास्त भटके, पाळीव कुत्रे आणि मांजरीचे मोफत लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । Voice Of Dog या प्राणीमित्र संघटने तर्फे जळगाव शहरातील 150 पेक्षा जास्त प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यांमध्ये मोकाट आणि पाळीव कुत्रे तसेच मांजरींचा ही समावेश होता.
यासोबतच सर्व प्राण्यांची Deworming आणि आरोग्य तपासणी सुध्दा करण्यात आली.

संघटनेने रबिवलेल्या या मोफत शिबिरास जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. राठोड (वैजंती पेट केअर क्लिनिक) यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर राबिविण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी Voice Of Dog संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शुभम चौधरी, तुषार चौधरी, हेमंत चौधरी, मोहित सेठीया, पवन सपकाळे, विशाल निंबाळकर, भुषण कांबळे, रोहित नाथजोगी, आदिती अडकमोल, स्नेहा सोनवणे, अमित हिरोले, सुमित सोनवणे, राहुल पवार, विवेक सुतार यांचा समावेश होता.

हे देखील वाचा: