---Advertisement---
बातम्या

रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! पुढील 1 वर्षासाठी मोफत रेशन मिळणार, गहू-तांदूळ किती मिळणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीला लागू करण्यात आलेल्या मोफत रेशन योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ही योजना पुढील एक वर्षासाठी वाढवली आहे. आता डिसेंबर 2023 पर्यंत बीपीएल कार्डधारकांना या योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळत राहील. Ration Card News Upadate

ration card

सरकारच्या या निर्णयाचा 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे. कोविडमुळे जनजीवन प्रभावित झाल्यानंतर 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PM गरीब कल्याण अन्न योजना) सुरू करण्यात आली आहे.

---Advertisement---

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने, गहू 2 रुपये प्रति किलो दराने आणि भरड धान्य 1 रुपये प्रति किलो दराने देते. सरकारने ठरवले आहे की डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल. याचा फायदा 81.35 कोटी लोकांना होणार आहे.

त्याचा भार सरकार उचलेल
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये लागतील, त्याचा बोजा केंद्र सरकार उचलेल, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ही योजना (PMGKAY) एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आली. मार्चमध्ये सहाव्यांदा या योजनेची मुदत वाढवण्यात आली.

ग्रामीण ते शहरी सर्वांना लाभ झाला
लोकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्न पुरेशा प्रमाणात मिळून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, ज्यामुळे लोकांना अन्न आणि पौष्टिक सुरक्षा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. या कायद्यांतर्गत 75 टक्के ग्रामीण लोकसंख्येला आणि 50 टक्के शहरी लोकसंख्येला संरक्षण मिळाले आहे, ज्यांना सरकारकडून अत्यंत कमी किमतीत अन्नधान्य पुरवले जाते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---