जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आडगाव उपकेंद्रात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान अंतर्गत 18 वर्षावरील तरूणी व महिला, गरोदर व स्तनदा माता, बचत गटातील महिला व गावातील पुरुषांची मोफत आरोग्य, रक्त तपासणी करण्यात आली तसेच उपस्थितांना आपापल्या आरोग्य संर्दभात काळजी कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आडगाव या गावात आरोग्य उपकेंद्र आहे. येथे तालुका आरोग्य विभाग आणी यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी केंद्राकडून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाव्दारे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 18 वर्ष वयोगटावरील गावातील तरूण, तरूणी गरोदर व स्तनदा माता, बचत गटातील महिला व गावातील पुरुषांची रक्त तपासणी यात एचआयव्ही, शुगर, सीबीसी आदींची तपासणी करण्यात आली यात 30 नागरीकांनी स्वेच्छेने एसआयव्ही चाचणी केली. ही तपासणी ग्रामीण रुग्णालय, यावल येथील आयसीटीसी विभागाचे वसंतकुमार संदानशीव यांनी केली तसेच कार्यक्रमात गरोदर माता व स्तनदा माता यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर तालुका आरोग्याधिकारी डॉ.गफ्फार तडवी, किनगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यात पवन काळे, कुर्शाद तडवी, मनीषा पाटील, शाहीन तडवी, आशा तडवी, मंगला बरेला आदींनी परीश्रम घेेतले.