डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे २७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि २७ जानेवारी ते २ फेबु्रवारी पर्यत विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ओपीडीत तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना मोफत तज्ञांचा सल्ला,बी.पी,२ डी इको, इसीजी तपासणी केल्या जाणार असून सवलतीच्या दरात इतर तपासण्या केल्या जाणार आहे. तपासणी नंतर आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात अॅडमिट झालेल्या रूग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया देखिल केल्या जाणार असून लागणा—या सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहे. शिबिरात जनरल सर्जरी, मुत्ररोग,दुर्बिणव्दारे शस्त्रक्रिया, कान,नाक,घसा, कर्करोग, मेंदू व मणका शस्त्रक्रिया, बालरोग,आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया देखिल केल्या जाणार आहे.
याचबरोबर दारूमूळे झालेले लिव्हर,पोट आणि अन्न नलिकेचे आजार तसेच अस्थमा,दमा, टीबी, हदयरोग, त्वचारोग, मानसोपचार, बालरोग विकारावर देखिल मोफत उपचार करण्यात येणार आहे. या साठी नावनोंदणी आवश्यक असून रूग्णांनी येतांना जूने रिपोर्ट व आधार व रेशन कार्ड सोबत आणावे. अधिक माहितीसाठी स्वराली ९८२२१४९६५९ प्रणाली ९८३४५४९४८७ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.