ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक

ऑक्टोबर 22, 2022 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ आक्टोबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील २७ वर्षीय तरुणास ऑनलाईनच्या माध्यमातून ८५ हजार ५०० रुपयाचा गंडा घातल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 06 14T142958.323 jpg webp

तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील २७ वर्षीय तरुण शुभम रविद्र पाटील हा ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रेडिंग करीत असताना त्याने युपीआयद्वारे ८५ हजार ५०० रुपये ९९०७४०८१३५ या मोबाईल धारकाला टाकले. परंतु त्याने परत देण्यास नकार दिल्याने तरुणाची फसवणूक झाली.

या प्रकरणी पिंपळगाव हरे.पोलिसात तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.शैलेश चव्हाण हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now