जळगाव जिल्हा
मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडे सात लाखांत फसवणूक
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । नागलवाडी येथील एकाने सातारा जिल्ह्यातील एका वाहन मालकाची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली तब्बल सात लाख 50 हजारात फसवणूक केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात आरोपी बापू सुका भील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील रहिवासी असलेल्या संशयित आरोपी बापू सुका भिल याने सातारा जिल्ह्यातील कामेरी येथील संतोष रामराव घाडगे यांची कामासाठी ऊसतोड मजूर पुरवितो,असे सांगून ब्बल सात लाख 50 हजार उचल घेत फसवणूक केल्याची घटना 19 सप्टेंबर 2022 रोजी घडली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात संतोष घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात संशयित आरोपी बापू सुका भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र सोनवणे करीत आहेत.