व्यवस्थापन परिषदेच्या एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज ठरले वैध

नोव्हेंबर 29, 2021 6:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधीमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी दोन जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये महेश घुगरी व सतीश पाटील यांचा समावेश आहे.

kbc nmu

दि.१८ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाकडून जाहिर करण्यात आला आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाली. छाननी अंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.आर.एल.शिंदे यांनी जाहिर केली. यात महेश घुगरी (धुळे एज्युकेशन सोसायटी, धुळे) व सतीश पाटील (किसान विद्या प्रसारक संस्था, पारोळा) यांचा त्यामध्ये समावेश आहे.

दि.५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now