⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ विभागातून जाणाऱ्या ‘या’ चार गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । एकीकडे नवरात्रोत्सव सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून यात रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कामासाठी रेल्वे गाड्या रद्द केल्यात आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात राजानंदगाव ते कळमना स्टेशन दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राजनांदगाव- कळमना दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम असल्यामुळे ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांचा समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या
गाडी क्र. १२८४९ बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस ही १२ रोजी सुटणारी गाडी सुरुवातीच्या स्थानापासून रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस १३ रोजी रद्द,
गाडी क्र. १२९४९ पोरबंदर-संत्रागाची एक्स्प्रेस १३ रोजी रद्द,
गाडी क्र. १२९५० संत्रागाची-पोरबंदर एक्स्प्रेस १५ रोजी रद्द करण्यात आली आहे