दुकानातील कामगाराच्या ‘टीप’वरून व्यापाऱ्याला लुटले, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

जानेवारी 27, 2023 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील पांडे चौकजवळ असलेल्या रामदेवबाबा मंदिराजवळ एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. एलसीबी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या ४८ तासात चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या माहितीवरून हा गुन्हा पूर्णत्वास आला आहे.

jalgaon news jpg webp

दि.२३ जानेवारी रोजी रात्री ९.२५ वाजेच्या सुमारास फिर्यादी ईश्वर बारुमण मेघाणे, रा.सिंधी कॉलनी, हे त्यांचे दाणाबाजार येथील बाबा हरदासराम ट्रेडर्स हे होलसेल मालाचे दुकान बंद करुन उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल विक्री करुन मिळालेले ८ लाख रुपये, एक लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, दुकानातील डायरी असे एका बॅगमध्ये टाकुन त्यांचे मोटारसायकलने घरी जात होते. जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असलेल्या रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन इसमांनी एका मोटारसायकलने पाठीमागुन येवुन त्यांचे मोटारसायकलला कट मारला, त्यामुळे फिर्यादी यांची मोटारसायकल हळु झाल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका इसमाने फिर्यादीने मोटारसायकलवर समोर ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावुन त्याच्याच साथीदाराच्या मोटारसायकलवर बसत तेथुन पळ काढला होता.

ईश्वर मेघाणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक व स्था.गु.शा. जळगाव यांना सुचना दिल्या होत्या. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी वेगवेगळे पथक नेमून आरोपीतांचा शोध घेणे सुरु केले होते.

एलसीबीच्या पथकातील हवालदार सुधाकर अंभोरे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे अशांनी फिर्यादीचे दुकानावर काम करणार संशयीत मुलास ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अधिक विचारपुस केली असता त्यानेच इतर साथीदारांना टिप दिल्याचे कबुल केले होते. त्याचवेळी एम.आय.डी.सी. पो.स्टे. चे पो.उप.निरी आनंदसिंग पाटील, स.फौ.अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, अल्ताफ पठाण, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे अशांचे तीन वेगवेगळे पथक तयार करुन त्यांनी गुन्हयातील इतर चार आरोपीतांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीतांनी गुन्हयाची कबुली देत गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी काढून दिल्या आहेत.

पाचही आरोपीना आज दि.२७ रोजी अटक करण्यात आली असुन गुन्हयामध्ये दरोडयाचे कलम वाढविण्यात आले आहे. गुन्हा स्था.गु.शा. जळगाव व एम.आय.डी.सी. पोलिसांनी संयुक्तरित्या उघडकीस आणला आहे. पुराव्याच्या दृष्टीने आरोपीतांची ओळख परेड घेणे आवश्यक असल्याने त्यांना बुरखा घालुन त्यांची ओळख उघड होणार नाही याबाबतची सर्व दक्षता घेत त्यांना न्यायालयात न्यायालयीन कस्टडी मिळणेकामी हजर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now