जळगाव पोलीस उपविभागाचा उद्या ‘जनता दरबार’

ऑगस्ट 5, 2022 8:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । जळगाव पोलीस उपविभागातील (जळगाव शहर, जिल्हापेठ, शनिपेठ, एमआयडीसी, जळगांव तालुका, रामानंद नगर) पोलीस स्टेशन हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वा. पावेतो मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंड जवळ जळगांव “तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” आयोजीत केलेले आहे.

maharashtara police jpg webp

तरी नागरीकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारींचे अडीअडचणी असल्यास दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वा. पावेतो पोलीस मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंड जळगांव येथे हजर राहावे. असे पोलीस प्रशासनाने कळवले आहे.

तक्रार निवारण दिनाचे दिवशी मा. डॉ. प्रविण मुंढे, पोलीस अधिक्षक जळगांव, मा. कुमार चिथा, सहायक पोलीस अधिक्षक, जळगाव उपविभाग, जळगाव व उपविभागातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now