पिकअप व्हॅनमध्ये कोंबलेल्या चार गुरांची सुटका

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ न्यूज २०२२ । पिकअप व्हॅनमध्ये चार बैलांना निर्दयतेने कोंबून चार बैलांची वाहतूक करणाऱ्या दोघांना मेहुणबारे पोलीसांनी अटक केली आहे. चारही बैलांची सुटका करण्यात आली असून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 12T160834.331 jpg webp

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावातील मारोती मंदीराजवळून चार बैलांचा निर्दयतेने कोंबून वाहतूक करत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस निरीखक तुषार देवरे यांना मिळाली. त्यानुसार मेहुणबारे पोलीसांनी १० जून रोजी रात्री ८ वाजता धडक कारवाई करत वाहन ताब्यात घेतले असून चारही बैलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शोएब खान ईकबाल खान (वय-२४) आणि अनिस खान हमिद खान (वय-२५) दोन्ही रा. चाळीसगाव जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनवर तडवी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now