जळगाव जिल्हा

सुरक्षा बलाच्या जवानामुळे टळली मोठी दुर्घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । वाकोद येथील रहिवासी तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान रोशन सुरेश जाधव याने कल्याण रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावताना, रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले.

अधिक माहिती अशी की, मुंबईकडून सुलतानपूरकडे जाणारी गोदान एक्सप्रेस १८ रोजी कल्याण स्टेशनवरून, ११ वाजून ५१ मिनिटांनी निघाली होती. या गाडीत चढताना पवन कुमार या प्रवाशाचा पाय घसरून तो खाली पडला. मात्र, त्याने गाडीच्या दरवाजाचे हॅँडल घट्ट पकडले होते. त्यामुळे तो गाडीसोबत फरफटत जात होता. प्रवासी प्लॅटफॉर्म व गाडीच्या मध्ये सापडून चिरडला जाण्याची भीती होती. ही थरकाप उडवारी घटना समोर पाहताच जवान रोशन जाधव आणि आरपीएफ कॉन्स्टेबल राखी पाल यांनी धाव घेत प्रवाशाला गाडीखालून प्लॅटफॉर्मवर ओढले. सुदैवाने यात प्रवाशाचे प्राण वाचले.

Related Articles

Back to top button