⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

एरंडोलात माझी वसुंधरा अभियानातंर्गत विविध स्पर्धेचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथे नगर पालीकतर्फे माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानातंर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यात ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जनजाती क्षेत्र प्रमुख किशोर काळकर यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. याकार्यक्रमांसाठी मुख्याधिकारी विकास नवाळे, नगरसेवक योगेश देवरे, मनोज पाटील, नितीन महाजन, अभिजीत पाटील,
सुरेश पाटील, जहीरोदीन शेख कासम, अब्दुल शकूर, असलम पिंजारी, नगरसेविका सरलाताई पाटील, सी.छायाताई दाभाडे, जयश्रीताई पाटील, आरतीताई
पाटील, नरेद्र पाटील,अतुल महाजन, कार्यालय अधिक्षक हितेश जोगी, अनिल महाजन, महेंद्र पाटील, डॉ.अजित भट, डॉ.योगेश सुकटे, विकास पंचबुध्दे, विनोद पाटील, आर.के.पाटील, लक्ष्मण पाटील, वैभव पाटील, रघुनाथ महाजन, प्रकाश सुर्यवंशी, एस.आर.ठाकूर, शरद राजपूत, संदिप शिंपी, कुसुम पाटील, आदीसह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, काळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नगरपालिका मार्फत माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी एक अतिशय चांगला उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आपण प्रत्येकांने पर्यावरण रक्षण करण्यासाठी मोलाची भूमिका आहे. तसेच स्पर्धेत सहभागी असलेले विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच चित्रकला स्पर्धासाठी हरित धरणी हिच सृष्टीची जननी,पाणी हेच जीवन,
नैसर्गिक व अपांरपारिक उर्जा संसाधने, हवेचे प्रदूषण सजीव सृष्टीचे भक्षण, हरित शहर हे माझे कर्तव्य, कचना पुन:वापर, प्लास्टिक बंदी याविषयावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धासाठी डी.डी.एस.पी कॉलेजचे प्राचार्य एन.ए.पाटील, साळुके सर, हेमंत पाटील सर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी सहभागी होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेत सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

हे देखील वाचा :