⁠ 
रविवार, मे 19, 2024

माजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा मानपत्र देऊन सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हाधिकारी पदावरून नुकतीच बदली झालेले माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निरोप देण्यासाठी व त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने येथील कांताई सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अभिजित राऊत यांना मानपत्र देण्यात आले.

रजिया तडवी, शकुंतला बारेला, पिनबाई बारेला या नवनिर्वाचित सरपंचाचे माजी उपसभापती नंदाबाई पावरा यांनी लोकसंघर्ष च्या वतीने सन्मान केला तसेच प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. प्रसंगी यावल आदिवासी प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे या देखील अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी प्रशासन हे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे आणि या प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून अभिजित राऊत यांनी जळगांव जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेसाठी तसेच सातपुड्यातील आदिवासी समूहांचे प्रश्न जाणून घेत नेहमी लोकाभिमुख निर्णय घेतलेत कोरोनाच्या काळात ही त्यांनी आपली कार्यकिर्द खंबीर पणे दाखवून दिली होती म्हणून लोकसंघर्ष मोर्चा त्यांचा आभारी आहे राऊत साहेब हे खऱ्या अर्थाने लोकांचे दोस्त होते, असे मत व्यक्त केले.

तसेच सातपुड्यातील आदिवासी समूहांच्या वतीने लोकसंघर्ष चे ताराचंद बारेला यांनीही राऊत साहेबांनी नेहमीच आमच्या भागातील आरोग्य , रोजगार, शिक्षण या बाबतीतल्या समस्या ऐकून घेतल्यात व त्या सोडवल्या, आमच्या वनहक्क प्रश्नांवर त्यांनी नेहमीच न्याय दिला म्हणून आम्ही नेहमीच त्यांची आठवण काढू असे सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ही अभिजित राऊत यांच्या कार्याच्या आठवणी सांगत त्यांनी सर्व स्तरातील लोकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलेत व सर्वांच्याच मनात आपले स्थान निर्माण केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना अभिजित राऊत यांनी सत्काराबद्दल लोकसंघर्ष मोर्चा चे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी महिला पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कार्डिले यांनी तर आभार प्रदर्शन पूजा भंगाळे यांनी केले. सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, राजेश पाटील, फारूक काद्री, फईम शेख, बिट्टू सालार आदी उपस्थित होते. किरण पाटील , कलीदर तडवी ,अजय मनोरे ,सत्यजित सपकाळे ,दामू भारंबे यांनी परिश्रम घेतले.