⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर; एबी फॉर्म मिळाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील ११ जागांवर अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीय. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलीय. जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला असून ‘एबी फॉर्म’ देखील देण्यात आल्याचं कळतं आहे.

ठाकरे गटाकडून चाळीसगाव मतदार संघातून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं कळतं आहे. उन्मेष पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईवरून चाळीसगावच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता लवकरच ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

खरंतर उन्मेष पाटील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनतर ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र लोकसभा २०२४ निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आले. यामुळे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यावेळी उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचं बोललं जात होते. मात्र उन्मेष पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही.

यामुळे उन्मेष पाटील चाळीसगावमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. अखेर ठाकरे गटाकडून चाळीसगाव मतदार संघातून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं कळत असून त्यांना ‘एबी फॉर्म’ देखील मिळाला असल्याची समजत आहे. दुसरीकडे चाळीसगावमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे आता दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप महायुतीसह महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नाहीय. तीन दिवसापूर्वी महायुतीमधील भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ उमेदवारांची अधिकृत घोषणा झालीय. आता लवकरच महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर होणार आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील तिढा सुटला नसून यामुळे जळगाव जिल्ह्यात संभ्रम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.