⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | गुन्हे | मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवारावरील गोळीबार संदर्भात मोठी अपडेट समोर

मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवारावरील गोळीबार संदर्भात मोठी अपडेट समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असताना मुक्ताईनगर बोदवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे बोदवड तालुक्यातील राजुर गावात प्रचाराला आले असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांकडून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनं एकच मोठी खळबळ जळगाव जिल्ह्यात उडाली आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय.

या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत एका जनाला ताब्यात घेतले आहे. मात्र अन्य दोघे अजूनही फरार आहेत. बोदवड- मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर त्यांची प्रचार फेरी सुरू असतांना दुचाकीवर असलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर हे पसार झाले होते.

याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोदवड आणि मुक्ताईनगर पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारे अवघ्या बारा तासात गुन्ह्याचा छडा लावला आहे. गोळीबार झालेल्या प्रकरणात पोलीसांनी तपास करत एका हल्लेखोराला शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. मात्र सदर प्रकरणातील दोन संशयित अद्याप फार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.